वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 19.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. मजबूत बॅटिंग लाईनअप असलेल्या हैदराबादला 159 धावा केवळ करता आल्या. स्टार्कने पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला खाते न उघडता बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. यानंतर त्याने नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमदलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. राहुल त्रिपाठीसह हेनरिक क्लासेनने डावाची धुरा सांभाळली आणि अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं.
धाव घेण्याचा कॉल हा नॉन स्ट्राईक एन्डवर उभा असलेल्या राहुल त्रिपाठीचा होता आणि त्याने क्रिझवर पोहोचण्याचा प्रयत्न केला हवा होता. कारण गुरबाज गोलंदाजीच्या शेवटी फेकणार होता. पण त्रिपाठीच्या धाव पूर्ण करण्याच्या आशा गमावल्या आणि मध्येच तो रनआउट झाला. अखेर ड्रेसिंग रुममध्ये जाताना त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाल्याचं दिसून आलं.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स , ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन , अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन. कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर , रहमानउल्ला गुरबाज , सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'
Rahul Tripathi Run Out IPL Qualifier 1 KKR VS SRH SRH Vs KKR
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »
स्रोत: News18 Hindi - 🏆 13. / 51 और पढो »
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »