महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमया

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Raireshwar Fort In Pune समाचार

7 Colors Of Soil,Forts Of Maharashtra,Pune Tourism

निसर्गाचा अद्भुत ठेवा असलेल्या सात रंगांच्या मातीची. सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान असलेल्या रायरेश्वर पाठरावर निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय.

कधी पाहिलाय का जमिनीवरचा इंद्रधनुष्य ? महाराष्ट्रात निसर्गाची ही अद्भुत किमया पहायला मिळते. पुण्याजवळील रायरेश्वर पठारावर सात रंगांची माती पहायला मिळते. स्वराज्याची शपथभूमी म्हणजे हा रायरेश्वर. सह्याद्रीच्या शिखरांमध्ये विराजमान अशा रायरेश्वर पठाराला ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. 4 हजार फूट उंच आणि 16 किलोमीटर लांब अशा या पठारावर निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो.

हा चमत्कार पाहण्यासाठी पठारावरची ही लोखंडी शिडी चढून पुढे जावं लागतं. ज्या मंदिरात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली, तेच हे शिवमंदिर इथून पुढे झाडाझुडपातून वाट काढत पुढे गेलं की निसर्गाचा हा अद्भुत ठेवा पाहायला मिळतो. सात रंगांची ही माती. मातीच्या सात रंगांचे ढीग एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ही सात रंगांची माती एकाच खडकापासून तयार झालीय. वातावरण, पाऊस यामुळे त्या जमिनीवर अनेक वर्षांपासून बदल होत गेला आणि ही सात रंगांची माती तयार झाली. लैटेराइट या खडकापासून पांढ-या, पिवळ्या,जांभळ्या, काळ्या, लाल, राखाडी आणि हिरव्या रंगांची माती इथे पाहायला मिळते. सात रंगांच्या मातीचा हा अद्भुत खजिना रायरेश्वराच्या पठारावर लपलाय. गरज आहे ती असे समृद्ध खजिने शोधून ते जतन करण्याची आणि पर्यटनाच्या दृष्टीनं अशी ठिकाणं विकसित करण्याची.

7 Colors Of Soil Forts Of Maharashtra Pune Tourism Maharashtra Tourism रायरेश्वर किल्ला पुणे रायरेश्वर किल्ला सात रंगाची माती

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ची नावाची गाडीही कुणी घेत नाहीHanuman Jayanti 2024 : विशेष म्हणजे गावात कोणी मुलाचं मारूती, हनुमान, पावनसुत अंजनपुत्र असे नाव ठेवत नाही. गावाची ओळख हि दैत्यांच्या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टMaharashtra Heat Wave: महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशाराSharad Pawar on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

48 नाही हे 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार निकालReal vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खरी शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी विरुद्ध नकली राष्ट्रवादी असा वाद सुरु आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »