चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Farmer Problems,Farmer,Ending Their Lives During Election Period

Loksabha election 2024 : सर्वाधिक प्रचारसभा झालेला जिल्हा विचित्र कारणामुळं आघाडीवर, काय आहेत शेतकऱ्यांपुढील आव्हानं, का उलचलताहेत ते टोकाची पावलं?

/ Loksabha election 2024 farmer deaths due to suicide rosed to 267 during election period लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातच नव्हे, तर राज्याच्या अनेक भागांमध्ये लहानातल्या लहान नेत्यापासून दिग्गजांपर्यंत अनेकांनीच हजेरी लावली आणि पाहता पाहता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक मुद्दे प्रकाशात आले. एकिकडे राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच या धामधूमीत दाहक वास्तव समोर आलं आणि नेमकी परिस्थिती मन विषण्ण करून गेली.

निवडणुकीच्या निमित्तानं ज्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रचारसभा झाल्या तिथंच 59 शेतकऱ्यांनी आयुष्याचा दुर्दैवी अंत केला आणि या विचित्र, नकारात्मक कारणासाठी हा जिल्हा यादीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. प्रचाराच्या दौऱ्यांदरम्यान शेतमालाला मिळणारा कमी दर, भावामध्ये सातत्यानं सुरु असणारी घसरण या आणि अशा मुद्द्यावरही चर्चा झाली, आता मात्र बळीराजाला या प्रश्नांवर तोडगा काढला जाण्याची अपेक्षा आहे.

इथं शेतकऱ्यांपुढं असणाऱ्या समस्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसतानाच आता निसर्गानंही या बळीराजावर अवकृपा दाखवणं सुरुच ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, सध्या मराठवाड्यातील पाणीपातळी घसरली असून इथं टँकरची संख्या 1578 इतकी झाली आहे. तर तिथं जायकवाडीनंही तळ गाठला आहे. इथं पाण्याची पातळी 6.14 टक्क्यांपर्यंत उतरली असून, साधारण महिना - दीड महिन्यासाठी पुरेल इतराच पाणीसाठी या धरणात असल्याचं म्हटलं जात आहे.

Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडायला सुरुवात झाली आहे. अनेक गावं, वाड्या, वस्त्यांवरही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, जिल्ह्यातील अनेक विहिरी, तलाव, धरण, नद्या अक्षरशः कोरड्या ठाक पडल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय. गेल्या वर्षी देखील इथं समाधानकारक पाऊस झाला नव्हता, त्यामुळे मे महिन्यातच सोलापूरकरांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय. एकीकडे अवकाळी पावसाचा सामना तर दुसरीकडे भीषण पाणीटंचाईचा फटका बळीराजाला देखील बसताना दिसून येतोय.

Farmer Problems Farmer Ending Their Lives During Election Period Why Farmer Of Maharashtra Facing So Many Problems Maharashtra Farmer Certificate Maharashtra Farmer Images Maharashtra Farmers Protest Maharashtra Farmers News महाराष्ट्र शेतकरी मराठी बातम्या बातम्या लोकसभा निवडणूक

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तवMaharashtra Farmer : राज्यात 4 महिन्यात 118 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात 66 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवलीये. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय..
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणीनाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Char Dham Yatra भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! एका दिवसात इतकेच लोक घेऊन शकणार दर्शनChar Dham Yatra : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरुवात होते आहे. त्यापूर्वी भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....Eknath Khadse Death Threat : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त समोर. धमकी देणाऱ्यां संशयितांमध्ये काही नावं समोर...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »