अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवड

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Salman Khan समाचार

Gangster Rohit Godara,Mumbai Police,Crime News

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.

बॉलिवुडचा भाईजान म्हणजे सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रविवारी गोळीबाराची घटना घडली. बाईकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी सलमानच्या घराच्या दिशेने चार गोळ्या चालवल्या. या घटनेची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेत पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब या पाच राज्यांच्या पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर पळून गेलेल्या हल्लेखोरांनी त्यांची बाईक वांद्रे परिसरातच सोडली. दोघेही हरियाणा किंवा राजस्थानचे रहिवासी आहेत. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांचे फोटोही समोर आले. यामधील एक व्यक्ती विशाल उर्फ कालू असल्याची माहिती पुढे आली आहे ज्याने हरियानामध्ये दोन महिन्यांपूर्वी एकाची हत्या केली होती. त्यामुळेच विशालनेच सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी योजना आखली जात होती. यासाठी हल्लेखारोंना निवडण्याचे काम अनमोल बिश्नोईने रोहित गोदाराला दिलं होतं. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रोहित गोदाराचे अनेक राज्यांमध्ये डझनभर प्रोफेशनल शुटर्स आहेत. सध्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सर्वात मजबूत नेटवर्क कोणाचे असेल तर ते अमेरिकेत बसलेला रोहित गोदराचे आहे. रोहित गोदाराने अलीकडेच राजस्थानमधील हायप्रोफाईल राजू थेठ हत्याकांड घडले होते.

लॉरेन्स बिश्नोई गॅंग ही आपल्या टोळीसाठी नेहमी शस्त्रांची एक खेप तयार ठेवते. अनेक राज्यांमध्ये हल्लेखोरांना त्यांच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार ठराविक ठिकाणी शस्त्रे मिळतात. तपास यंत्रणांना पूर्ण संशय आहे की रोहित गोदाराने त्याच्या इतर साथीदारांकडून दोन्ही शूटर्सना शस्त्रे पुरवली आणि त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. बिष्णोई गँगचा इतिहास सांगतो की या टोळीसाठी काम करणाऱ्या हल्लेखोरांना लॉरेन्स गँगने कधीच कामावर घेतले नाही. उलट हे हल्लेखोर स्वत: टोळीत सामील होऊन मोठे काम करण्यास सदैव तयार असतात.

Gangster Rohit Godara Mumbai Police Crime News Marathi News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

माझ्या जीवाला धोका असूनही...'; सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर घोसाळकरांच्या पत्नीची उद्विग्न पोस्टSalman Khan House Firing: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

चाकरमान्यांसाठी खूशखबर! उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेच्या महत्त्वाचा निर्णयSummer Special Trains : उन्हाळी सुट्टी पडताच अनेकजण आपले कुटूंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करत असतात. तुम्ही पण उन्हाळी सुट्टीत कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पहाटेच्या फायरिंगनंतर कसं आहे सलमान खानच्या घरचं वातावरण? मित्राने सांगितला तपशीलSalman khan House firing: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिण्षोई गॅंगकडून उघडपणे सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान 14 एप्रिलची पहाट गॅलेक्सी अपार्टमेंटला धडकी भरवणारी ठरली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Salman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारीSalman Khan Firing : सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »