अटल सेतूमुळं 'ट्रॅफिक' जॅम, आता करणार वाहतुकीत बदल; असे आहेत पर्यायी मार्ग

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Atal Setu Bridge समाचार

Mumbai Trans Harbour Link,Atal Setu Bridge Traffic,Atal Setu Traffic Today

Atal Setu Bridge Traffic: अटल सेतूमुळं दक्षिण मुंबईत काही प्रमाणात वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यावर वाहतूक विभागाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

अटल सेतूमुळं मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचे अंतर कमी झाले असले तरी अनेकदा अटल सेतूमुळं वाहतुक कोंडीत वाढ झाल्याचेदेखील चित्र आहे. अटल सेतू मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांमुळं सकाळी आणि संध्याकाळी पी डिमेलो मार्गावर वाहनांच्या वेगाला ब्रेक लागत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळं अटल सेतूवरुन वाचलेला वेळ ट्रॅफिक जॅममध्ये खर्ची जातो, अशी प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळंच प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एस.व्ही.पी. रोड येथून उजवे वळण घेऊन पी. डिमेलो रोडच्या दक्षिण वाहिनीवर जाणाऱ्या वाहतुकीस पुढील 180 दिवस निर्बंध घालण्यात आले आहेत, मुंबई वाहतूक पोलिसांनी अशी माहिती दिली आहे. अटल सेतूवरुन ये-जा करणाऱ्या वाहनांमुळं सर जे.जे. रोड, इब्राहिम रेहमतुल्ला रोड, मोहम्मद अली रोड, पी. डिमेलो रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळं अटल सेतूवर वाचलेला वेळ या वाहतुक कोंडीत गेल्याने मुंबईकर हैराण झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी वाहतुक विभागाने वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरांना जोडण्यासाठी शिवडी न्हावा शेवा मार्ग हा प्रकल्प आहे. अटल सागरी सेतू 21.8 किमी लांबीच्या या मार्गावरुन अवघ्या 15 मिनिटांत मनी मुंबईत पोहोचता येते. त्यामुळं प्रवाशांचा वेळदेखील वाचतो. पण ईस्टर्न फ्री वे आणि अटल सेतूवरुन दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळं दक्षिण मुंबईतील काही मार्गांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत आहे. वाहतुक कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी काही बदल करण्याचा निर्णय वाहतुक विभागाने घेतला आहे.

Mumbai Trans Harbour Link Atal Setu Bridge Traffic Atal Setu Traffic Today Atal Setu Bridge Timings Today Mumbai News अटल सेतू वाहतूक कोंडी अटल सेतू बातम्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईकरांनो लक्ष द्या! मतमोजणीच्या दिवशी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 'या' वाहनांना बंदीTraffic Restriction : लोकसभा निकालाच्या मतमोजणीच्या दिवशी मुंबईत काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' व्यक्तींना 5 लाखांपर्यंतचे उपचार फ्री; CM शिंदेंची घोषणाFree Health Insurance Upto 5 Lakhs: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भातील घोषणा केली असून तातडीने आधार कार्ड लिंक करण्याचं काम पूर्ण करावं असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणारअजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीची मान्यता रद्द झाली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरेमुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Shivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यताLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »