अंध व्यक्ती मतदान कसं करतात? ईव्हीएमवरचं बटण कोण दाबतं?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 76 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

How Blind Voters Vote,Blind Voters On EVM,अंध व्यक्ती मतदान

Blind Voters Vote: सध्या देशात निवडणुकीचे वारे घोंगावतायत. देशात 7 टप्प्यात मतदान होत असून यातील 4 टप्पे पूर्ण झाले आहेत. अजून 3 टप्पे बाकी आहेत. या मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. यावेळची मतदानाची टक्केवारी कमी होताना दिसत असली तरी मतदानाबद्दल प्रत्येक उत्सुकता असते.

Blind Voter Vote: अंध व्यक्ती आपलं मत कसं नोंदवतात? तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.सध्या देशात निवडणुकीचे वारे घोंगावतायत. देशात 7 टप्प्यात मतदान होत असून यातील 4 टप्पे पूर्ण झाले आहेत. अजून 3 टप्पे बाकी आहेत. या मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. यावेळची मतदानाची टक्केवारी कमी होताना दिसत असली तरी मतदानाबद्दल प्रत्येक उत्सुकता असते. मतदान आपला अधिकार आहे. आपण आपला नेता निवडतो. त्यामुळे मत द्यायला हवे. यासाठी सरकारदेखील प्रोत्साहन देत असते.

दृष्टी असलेल्यांना ईव्हीएम मशिन, त्यावरील उमेदवाराचे निशाण आणि त्यासमोरील बटण पाहून मत देता येते. पण दृष्टीहिनांना हे सोयीस्कर नसते. पण निवडणूक आयोगाने दृष्टीहिन बांधवांची मतदान करण्याची योग्य व्यवस्था केली आहे.दृष्टीहिन मतदारांना आपला हक्क बजावता यावा, मत देता यावे यासाठी निवडणूक आयोगाने नियम बनवला आहे. या नियमाचे प्रत्येक मतदान केंद्रावर पालन केले जाते. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना अगोदरच माहिती दिली जाते.दृष्टीहिन व्यक्ती मतदान केंद्रावर येत असेल तर त्याच्यासोबत एका व्यक्तीला आत जाऊ दिले जाते.

मग आता दृष्टीहिन मतदारासोबत असलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या वतीने मतदान करते का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही योग्य आहात. कारण दृष्टीहिन व्यक्तीला बटण ओळखणे कठीण असते. अशावेळी आपल्याला कोणाला मत द्यायचे आहे ते ती सोबतची व्यक्तीला सांगते. त्यानंतर दृष्टीहिन मतदाराच्या उपस्थितीत ती व्यक्ती त्याच्या वतीने मतदान करते.

काहीवेळा दृष्टीहिन मतदाराचे बोट घेऊनही त्याला हव्या असलेल्या व्यक्तीला मत दिले जाते. दरम्यान ही सर्व प्रक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडते.दृष्टीहिन बांधवांसोबत मतदान करण्यास कोणती व्यक्ती जाऊ शकते? यासाठी देखील निवडणूक आयोगाने नियम आखून दिले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. सोबत असलेल्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. एक व्यक्ती एका दृष्टीहिन व्यक्तीसोबत एकदाच मतदान द्यायला जाऊ शकतो. तीच व्यक्ती परत दुसऱ्या दृष्टीहिन व्यक्तीसोबत जाऊ शकत नाही.

मला स्वत:ला माझ्या हातून मत द्यायचे आहे, असे कोणी दृष्टीहिन व्यक्ती म्हणत असेल तर त्याला तसे करण्याची परवानगी आहे. अशावेळी निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली हे मतदान पार पडते.मनोरंजन

How Blind Voters Vote Blind Voters On EVM अंध व्यक्ती मतदान ईव्हीएमवरचं बटण Election 2024 Polling Booth Blind Voters निवडणूक 2024 मतदान केंद्र दृष्टिहीन मतदार अंध मतदार Lok Sabha Lok Sabha Election 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?Loksabha Election 2024 : राज्याच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं असून, एका जिल्ह्यात येणारी जवळपास 14 गावं दोन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतात.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rajasthan Lok Sabha Election: क्या 2014 और 2019 का प्रदर्शन दोहरा पाएगी बीजेपी? जानिए कांग्रेस के प्लान में कितना दमपहले चरण के मतदान के मतदान प्रतिशत के आंकड़े बताते हैं कि राजस्थान में जिन 12 सीटों पर मतदान हुआ उनमें से सभी में मतदान प्रतिशत में गिरावट देखी गई है।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

RCB Playoffs: अजूनही 'या' समीकरणाने प्लेऑफ गाठू शकते आरसीबी; पाहा कसं आहे गणित?Royal Challengers Bangaluru Playoffs IPL 2024: जर तुम्ही विचार करत असाल की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू प्लेऑफ गाठू शकणार नाही तर तसं नाहीये. आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीची गणितं फार कठीण आहेत. मात्र आरसीबी प्लेऑफ गाठणं अशक्य नाहीये.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »