SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरती

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Sbi समाचार

Government Jobs,सरकारी नौकरी,SBI Hiring

Government Jobs 2024 : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या SBI मध्ये आता मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण 12000 कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आलीये.

सरकारी नोकरी कोणाला नको असते. अनेकजण सरकारी नोकरीसाठी खटपट करत असतात. अशातच बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती करण्यात येणार आहे. शंभर दोनशे नव्हे तर तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रकिया होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी गुरुवारी दिली. आयटीसोबतच या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या भूमिकांबद्दल प्रशिक्षण देखील दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारतातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेत एसबीआयमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 2 लाख 32 हजार 296 कर्मचारी होते, जे 2022-23 या आर्थिक वर्षातील 2 लाख 35 हजार 858 कर्मचाऱ्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आता एसबीआयने भरती प्रकिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत सुमारे 11,000 ते 12,000 कर्मचारी भरती प्रक्रियेत आहेत, जे सामान्य कर्मचारी आहेत, अशी माहिती दिनेश खारा यांनी दिली.

बँकेच्या नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी तंत्रज्ञान कौशल्याचा विचार करत आहे, असंही खारा यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत एसबीआय बँकेचा निव्वळ नफा 24 टक्क्यांनी वाढून 20,698 कोटी रुपये झाला आहे. त्यानंतर बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक इक्विटी शेअरवर 13.70 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे आता एसबीआय सध्या मजबूत स्थितीत असल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, येत्या काळात तुम्हाला भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.i ला भेट द्यावी लागेल. यानंतर, उमेदवाराने करिअर लिंकवर क्लिक करावे आणि घोषणेवर जावे आणि भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावं. आता तुम्हाला नवीन पृष्ठावरील नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर लॉगिनद्वारे अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.महाराष्ट्र

Government Jobs सरकारी नौकरी SBI Hiring SBI Chairman Chairman Dinesh Khara Sbi Recruitment SBI New Jobs SBI Hiring Process SBI Recruitment Hiring Process Government Jobs In SBI

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेशशिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

SRK च्या KKR विरुद्ध पंजाबच्या विक्रमानंतर सलमानची पोस्ट Viral! रात्री दीडला रिप्लायIPL 2024 PBKS Beat KKR Salman Khan Post: आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी करत पंजाबच्या संघाने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात 260 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'मध्ये काम करण्यासाठी कोणी घेतलं सगळ्यात जास्त मानधन?नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा आतापर्यंतचा सगळ्यात ग्रॅंड प्रोजेक्ट आहे. हीरामंडीची पटकथा ही 1940 च्या दशकात असलेल्या ब्रिटीश राजवटीतीली भारतावर आधारीत आहे. हीरामंडीत राहणाऱ्या वेश्यांवर आधारीत आहे. या सीरिजमध्ये सगळंच खूप महाग आणि लग्झरीयस होतं
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »