Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदल

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Mumbai Local समाचार

Mumbai Local Megablock,Mumbai Local Time Table,Mumbai Local Mega Block

Mumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...

सुट्टीचा दिवस म्हटलं की, अनेक मंडळी घराबाहेर पडतात. भटकंतीपासून भेटीगाठींपर्यंतचा बेत या सुट्टीच्या निमित्तानं आखला जातो. त्यातही सध्याची वाहतूक कोंडी पाहता किमान वेळात कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतून अनेकांचीच पसंती मुंबई लोकलला असते. रविवारी म्हणजेच 19 मे 2024 च्या दिवशी मुंबई लोकलनं प्रवास करायचा बेत असेल तर आताच प्रवासासाठीचे इतर पर्याय तयार ठेवा किंवा प्रवासाच्या वेळेची योग्य आखणी करा. कारण, रविवारी रेल्वे मार्गावर असणाऱ्या मेगाब्लॉक मुळं मोठ्या संख्येनं प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

उपनगरीय रेल्वे रुळांवरील दुरूस्तीकाम आणि सिग्नल यंत्रणेसंदर्भातील तांत्रिक काम हाती घेण्यात येणार असल्यामुळं मध्य आणि हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार मध्य रेल्वेमार्गावर माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल. तर, हार्बर मार्गावर कुर्ला- वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र कोणत्याची अडचणींचा सामना करावा लागणार नाही, तरीही मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं या मार्गावरील गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेमार्गावर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. यादरम्यान CSMT वरून सुटणाऱ्या Fast Local माटुंगा आणि मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील. तर, ठाण्यापासून पुढे या लोकल पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याहून सुटणाऱ्या जलद लोकल मुलुंड ते माटुंग्यादरम्यान अप धिम्या मार्गावर धावतील आणि पुढे त्या निर्धारित स्थानकांवर थांबतील. लोकलच्या अपेक्षित स्थानकात पोहोचण्यच्या वेळांमध्ये साधारण 15 मिनिटांचा उशिर अपेक्षित आहे, त्यामुळं प्रवाशांनी वेळेचं नियोजन करून प्रवासाची आखणी करावी.

मेगाब्लॉकचा परिणाम हार्बर मार्गावरही होणार असून, मध्य रेल्वेप्रमाणंच सकाळी 11.10 मिनिटांपासून सायंकाळी 4 वाजून 10 मनिटांपर्यंत हा ब्लॉक कालावधी असेल. यादरम्यान वाशी, बेलापूर आणि पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील.मनोरंजन

Mumbai Local Megablock Mumbai Local Time Table Mumbai Local Mega Block मुंबई मेगाब्लॉक मराठी बातम्या मुंबई रेल्वे रेल्वे रेल्वे विभाग मुंबई लोकल

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंदMumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दरPetrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायमMaharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »