Monsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशारा
विदर्भ आणि मराठवाड्यात धडकणाऱ्या अवकाळी पावसानं कोकण आणि मुंबईचीसुद्धा वेस ओलांडली आणि अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली. सोमवारी सकाळपासून ज्या मुंबई आणि उपनगरांमध्ये उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले होते त्याच भागामध्ये दुपारनंतर मात्र हवामानात अचानक बदल होण्यास सुरुवात झाली आणि शहरातील काही भागांना अवकाळी पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी मोठाले वृक्ष, होर्डिंग पडल्याच्या दुर्घटना घडल्या. दरम्यान हे सर्व सुरु असताना मान्सूनची सुरुवात झाल्याचा अनेकांचाच समज झाला पण, प्रत्यक्षात तसं नाहीय.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा अशी एकंदर स्थिती पाहायला मिळेल. इथं ताशी 50-60 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांत आकाश अंशत: ढगाळ राहील.
खबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागामध्ये वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण होऊन हे वारे उत्तरेच्या दिशेनं पुढे जातात. पृथ्वीच्या परिभ्रमण क्रियेमुळं हेच वारे मान्सूनच्या दिशेनं मार्गी लागतात आणि अंदमान भागात दाखल होतात. तिथं या वाऱ्यांमुळं ढग तयार होऊन पावसाला सुरुवात होते. अंदमानमध्ये साधारण 24 तासांसाठी हा पाऊस झाल्यावर मान्सून देशात दाखल झाला असं ओळखलं जातं.
Monsoon News Maharashtra Weather News Maharashtra Weather Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »