Loksabha : मतदानात खोडा अन् राजकीय राडा; कुठं ईव्हीएममध्ये बिघाड, तर कुठं गोंधळ

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 73 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Lok Sabha Election समाचार

Voting Scams,Political Outcry,EVM Failure

Lok Sabha Election 2024 : राज्यातील 13 जागांसाठी मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडला. अनेक ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडाच्या घटना घडल्याने प्रचंड गोंधळ झाला. नाशिकमध्ये तर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गदारोळ झाला. दिवसभरात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदानाचा पाचवा आणि अखेरचा टप्पा पार पडला. हा अखेरचा हाय व्होल्टेज टप्पा गाजला तो वादंगाच्या प्रसंगांनी. नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते आमने-सामने आल्याने दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटात वाद झाल्यानं घटनास्थळी पोलीस दाखल झाले. हा सगळा प्रकार नाशिकच्या भद्रकाली हद्दीत घडलाय.

तर दुसरीकडे भांडूपमध्ये पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठा राडा झालाय. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा डेमो ठेवल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे आमदार सुनील राऊतांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना तंबी दिलीय. कार्यकर्त्यांना अटक करू नये, असंही त्यांनी पोलिसांना बजावलंय. तर पराभवाच्या भीतीने रडीचा डाव सुरू असून, कायदा हातात घेणा-यांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदेंनी दिलाय.

तिकडे ओशिवरामध्येही भाजप व ठाकरे गटामध्ये वाद झाला. भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर नेल्याचा आरोप ठाकरे गटानं केल्यानं खळबळ उडाली. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारीदेखील समोर आल्यात. भरउन्हात रांगेत उभं राहावं लागल्याने नागरिकांचा संताप झाल्याच्या घटना घडल्यात. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांनंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. आता निकालात कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये सोमवारी सरासरी 56.68 टक्के मतदान झालंय. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये ७३ टक्के तर सर्वात कमी 48.66 टक्के मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रातील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी या मतदारसंघांचा समावेश आहे.

Voting Scams Political Outcry EVM Failure Some Confusion Loksabha Polls Maharastra Loksabha Polls Loksabha Election 2024 Latest Marathi News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Lok Sabha polls : कुठं पैसेवाटप, तर कुठं राडा! चक्क बोगस मतदान; मतदानाचा चौथा टप्पा गोंधळाचाLok Sabha polls In Maharastra : महाराष्ट्रात मतदानाचा चौथा टप्पा पार पडला. मात्र आधीच्या तीन टप्प्यांच्या तुलनेत हा टप्पा बऱ्याच अंशी गोंधळाचा ठरला. पाहुयात नेमकं कुठे काय घडलं?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईसह 13 मतदारसंघाचं भवितव्य ईव्हीएममध्ये होणार बंदLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होणार असून हा शेवटचा टप्पा आहे. यानंतर महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल ती 4 जूनच्या निकालाची.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसलेArvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती लावली अन् भाजपवर घणाघाती टीका केली. त्यावेळी केजरीवालांच्या एका वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) हसले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये राजकीय भूमिका मांडण्यासोबतच काही गौप्यस्फोटही केले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »