मोठी बातमी! दिल्ली एअरपोर्टचं छत कोसळलं; अनेक कार चक्काचूर, पाहा Video

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Roof समाचार

Collapses,Delhi Airport,IGI

Delhi Airport Roof Collapses: दिल्ली विमानतळावरील छताचे मोठमोठे खांब अचानक कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. हे खांब थेट विमानतळावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर कोसळल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच IGI विमानतळावरील टर्मिनल 1 वर मोठा अपघात झाला आहे. विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत आणि खांब गाड्यांवर कोसळलंय. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 4 जण जखमी झाल्यचे समजते. कोसळलेल्या छताच्या मलब्या खालून सर्वांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र अजूनही काही गाड्या छताखाली अडकल्या आहेत.

अपघातानंतर विमानतळावर काय परिस्थिती होती यासंदर्भातील एका व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओवरुन अपघाताची दाहकता सहज लक्षात येते. धातूंच्या मोठमोठ्या खांबांखाली कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या वेगवेगळ्या कारमध्ये अडकलेल्या चौघांना सुखरुप बाहेर काढून उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली अग्निशामन दलाने दिली आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत. अशातच विमानतळावरील अपघाताच्या बातमीने एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे सध्या दिल्ली विमानतळ अंशतः बंद ठेवण्यात आलेलं आहे, दिल्ली विमानतळावरील टर्मिनल 1 वरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून तशापद्धतीची माहिती प्रावाशांना दिली जात आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र दिल्ली तसेच दिल्ली एनसीआर भागामध्ये गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. वीजांच्या कडकडाटासहीत मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी बाकी मनस्ताप दिल्लीकरांना सहन करावा लागत आहे. दिल्लीत मान्सून पूर्व पावसामुळे सर्वाधिक तापमान 40 अंश सेल्सिअसखालीच राहिलं.

Collapses Delhi Airport IGI Terminal 1 Injured Video

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपPune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : राजतिलक की करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राज्यात महायुतीला बसणार धक्का? मविआच्या वाट्याला किती जागा? पाहा ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज!Loksabha Election 2024 : राज्याच्या निवडणुकांमधील लहानमोठी माहिती जनतेपर्यंत आणणाऱ्या वार्ताहरांपासून मतदारांपर्यंत, लोकशाहीच्या या जागराविषयीची सर्वात मोठी बातमी.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशाराHigh Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंModi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »