चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 78 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Chardham Yatra News समाचार

चारधाम यात्रा,Chardham Yatra,केदारनाथ

Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.

आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी असा अनेकांचा मानस असतो. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेचा शुभारंभ झाला. पण यानंतर सरकारने अनेक कठोर नियम व अटी लागू केले आहेत. उत्तराखंड सरकारने लावून दिलेल्या अटीनुसार आता मंदिरापासून 200 मीटरवर मोबाईल फोनन प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चारधाम यात्रा करताना 2000 मीटरपासून मोबाईल बंदी केली आहे.

मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी सांगितले की, या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. चारधाम यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांचा उद्देश फक्त फिरणे, प्रवास करणे असा असतो. अशा लोकांच्या काही कृतींमुळे लोकांच्या श्रद्धेला तडा जात आहे. त्यामुळे ही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे.

आम्ही सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवत आहोत की कोणत्याही भाविकाने नोंदणी नसलेल्या वाहनाने किंवा नोंदणी न करता येऊ नये. पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर चार धामला भेट देण्यासाठी नोंदणीची यंत्रणा सुरू झाली आहे. तसेच यावेळी कुठेही चेंगराचेंगरी झाली नसल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. अशा अफवा कोणी पसरवल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

आजकाल चारधाममध्ये मंदिरे गर्दीने भरलेली असतात. सहा दिवसांत 1,55,584 यात्रेकरू केदारनाथला पोहोचले आहेत. दररोज 10 हजारांहून अधिक भाविक यमुनोत्री धामला पोहोचत आहेत. गंगोत्री धाममध्ये दररोज 12 हजारांहून अधिक भाविक येत आहेत. दोन्ही धामांवर क्षमतेपेक्षा जास्त भाविक येत आहेत. उष्ण ठिकाणांहून येणाऱ्या लोकांना परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचण येते.

त्यामुळेच आतापर्यंत यात्रा मार्गावर विविध ठिकाणी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हे टाळण्यासाठी आरोग्य विभागाने एकूण 14 भाषांमध्ये आरोग्य सूचना जारी केल्या आहेत. दुसरीकडे, उंच हिमालयात स्थित पंच केदारांपैकी चौथा केदार असलेल्या रुद्रनाथ मंदिराचे दरवाजे 18 मे रोजी उघडले जातील.प्रवासाच्या प्रत्येक थांब्यावर प्रवाशांसाठी जेवण, पाणी, स्वच्छतागृहे आदींची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत कुठेही चेंगराचेंगरी झालेली नाही. अशा अफवा कोणी पसरवल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

चारधाम यात्रा Chardham Yatra केदारनाथ Chardham Yatra 2024 चारधाम यात्राचे नियम चारधाम यात्रेत मोबाइल बंद Chardham Yatra 2024 Kedarnath Badrinath चारधाम यात्रा 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलMDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »